- Date : 13/12/2017
- Source : Bytes of India
नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’मध्ये रुफटॉप सोलर प्लॅंट
भारतातील सर्वांत मोठी रुफटॉप सोलर डेव्हलपर असलेल्या आणि या बाजारपेठेत १५.८ टक्के हिस्सा असलेल्या ‘क्लिनमॅक्स सोलर’ कंपनीने पुण्यातील ‘आयसीएआर –
नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’साठी रुफटॉप सोलर प्लँट विकसित आणि कार्यान्वित केला आहे. ७० केडब्ल्यूपी क्षमतेच्या या रुफटॉप ग्रिड सोलर इन्स्टॉलेशनचे उद्घाटन
‘डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड एज्युकेशन’चे (डीएआरई) सचिव, तथा ‘आयसीएआर’चे सरसंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्र आणि संचालक डॉ. एस. डी. सावंत यांच्या हस्ते झाले.